ठाणे
ट्रकच्या धडकेत मुलीचा मृत्यू…

ठाणे – रस्ता ओलांडत असताना एका १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शिळफाटा सर्कल परिसरात हि घटना घडली.
शिळफाटा येथील शेळ महापे रोड परिसरात शिळ महापे रोड येथील पेट्रोल पंप जवळ हि मुलगी रस्ता ओलांडत होती. त्यावेळी एका टेम्पोने तिला धडक दिली. आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.