बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त; दोघांना अटक…

मुंबई – बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त करून सी. बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी दोघांना अटक केली.
माहिम येथील रेतीबंदर परिसरात एक इसम LAKME, LOREAL, HUDA BEAUTY, MAYBELLINE या नामांकीत ब्रँडची बनावट सौंदर्यप्रसाधने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी माहिम रोतीबंदर येथे सापळा रचून बनावट सौंदर्यप्रसाधनांचा साठा (LAKME, LOREAL, HUDA BEAUTY. MAYBELLINE अशा नामांकीत कंपन्यांचे बनावट सौंदर्यप्रसाधनाचे एकूण ४३०८ नग किंमत रु. १८,०७,८१०/-) जप्त करून एका इसमास अटक केली. तसेच माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
त्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती मिळवून नालासोपारा येथील गोदाम व २ सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकून विविध नामवंत कंपन्यांची तसेच ती बनविण्यासाठी वापरण्यात येणारी मशीनरी व कच्चा माल जप्त केला. आणि कारखान्याच्या मालकास अटक केली.
सदरच्या कारवाईमध्ये पोलिसांनी नालासोपारा येथील गोदाम व कारखान्यामधून Lakme Face Compact, Lakme Care Cream, Lipsticks, Loreal Shampoo, Loreal Masque, Tattvom Face Gel, Facial Creams, Sacs Includes with Facial Powder, Hair Creams, Huda Beauty Cream अशी विविध कंपन्यांची बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त केली. तसेच कारखान्यातून सौंदर्यप्रसाधने पॅकींग करण्याकरीता वापरण्यात येणारे Lakme व इतर नामांकीत कंपनीच्या नावाचे रिकामे बॉक्स, स्टिकर्स, पॉकींगचे साहित्य, सुटी कॉसमॅटीक पावडर, Emboss Machine, Compact Powder Maker Machine असा एकूण रूपये १,४१,७४,८१५/ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.