देश
अखेर मान्सून केरळमध्ये दाखल…

केरळ – मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
मान्सून तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दिशेने पुढे सरकत आहे. पुढील २४ तासांत तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, साधारणपणे मान्सून १ जून पर्यंत केरळमध्ये दाखल होतो, पण केरळमध्ये मान्सून उशिरा आल्याने राज्यातील पाऊसही लांबला आहे.