लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या…

मीरा रोड – लिव्ह इन रिलेशन मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हि हत्या तिच्या मित्राने केली असल्याचे उघड झाले असून नया नगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मनोज सहानी असे याचे नाव आहे. तर मयत तरुणीचे नाव सरस्वती वैद्य असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घराला कुलूप होते. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना तिथे तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. हे दोघे लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत होते. या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या मनोजने तिची हत्या केली. त्यानंतर झाड कापणारी मशीन आणली आणून या तरुणीच्या शरीराचे तुकडे केले.
सदर प्रकरणी पोलिसांनी मनोजला अटक केली आहे.