ठाणे पोलिसांकडून ७११ मोबाईल मूळ मालकांना परत…

ठाणे – ठाणे पोलिसांकडून ७११ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
परिमंडळ – १. ठाणे मधील पोलीस स्टेशन स्तरावर मालमत्ता विरोधी गुन्हे व प्रॉपर्टी मिसिंग प्रकरणांत मोठया प्रमाणात मोबाइल हरविले / चोरी गेलेबाबत तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने पोलिसांनी Central Equipment Identity Register ( CEIR ) पोर्टलचा वापर करून https://ceir.gov.in या संकेतस्थळावर हरविलेले / चोरीस गेलेल्या मोबाईल धारकांची वैयक्तिक माहिती भरुन तसेच IMEI चे CDR मागवून सदरचे मोबाईल निगराणीखाली ठेवून एकूण १ कोटी २८ लाख रुपये किंमतीचे विविध कंपनीचे एकूण ७११ मोबाईल हस्तगत केले.

त्यानंतर पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -१. ठाणे तर्फे आयोजित मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम अंतर्गत विविध गुन्हयातील जप्त करण्यात आलेले तसेच प्रॉपर्टी मिसिंग मधील हस्तगत करण्यात आलेले एकूण १ कोटी २८ लाख रुपये किंमतीचे विविध कंपनीचे एकूण ७११ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.

सदर कार्यक्रम जय जीत सिंह, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, दत्तात्रय कराळे, पोलीस सह आयुक्त, डॉ. महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर व गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पो.स्टे. यांनी केले तर प्रास्ताविक सचिन गावडे, वपोनिरी शिळ डायघर यांनी केले आणि आभार प्रदर्शन विलास शिंदे, सहा पोलीस आयुक्त, कळवा विभाग यांनी केले.
सदर कार्यक्रमास परिमंडळ-१, ठाणे मधील पो स्टे ठाणेनगर, नौपाडा, राबोडी, कळवा, मुंबा व शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व विशेष पथकातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच अनेक नागरीक उपस्थित होते.