राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. आयएल आणि एफएस या प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
या प्रकरणी जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यावेळी मला ईडीने नोटीस पाठवली त्यांनतर ६ वाजता एका हवालदाराने नोटीस आणून मला दिली. नोटिशीमध्ये चौकशीला बोलावण्याचं काही कारण सांगितलेलं नाही. यात आयएलएफएस नावाच्या संस्थेचा उल्लेख आहे. त्यासंबंधीची ही केस आहे. त्या संस्थेशी संबंधित प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. माझा या संस्थेशी कधीच संबंध आला नाही. मी कधी त्यांच्या दारात गेलो नाही, कधी त्यांच्याकडून कर्ज घेतलं नाही, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही.
आता त्यांनी बोलावलं आहे म्हटल्यावर जावंच लागेल. मी त्यांच्या चौकशीला सामोरा जाईन. घरी सध्या लग्नसराई आहे, जवळची लग्नं आहेत, त्यामुळे मी त्यानंतरची वेळ मागणारं पत्र पाठवून देईन. ईडीची नोटीस कशासाठी येते हे भारतात सर्वांना माहिती आहे. असे जयंत पाटील म्हणाले.