ठाणे
जबरी चोरी करणारे हत्यारासह अटक…

ठाणे – रात्रीच्या वेळी जबरी चोरी करणाऱ्या तिघांना बिनापरवाना देशी बनावटीच्या पिस्टल आणि धारदार हत्यारासह गुन्हे शाखा, भिवंडी युनिट २ युनिट पोलिसांनी अटक करून ९ गुन्हे उघडकीस आणेल. नौशाद उर्फ अतिक हलीम अन्सारी, इमार अख्तर सैय्यद, रोशनाली बरकत अली सैय्यद अशी या तिघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून २ गावठी बनावटीचे अग्निशस्त्र, ५ जिवंत काडतुसे, ९ धारदार सुरे, तसेच जबरी चोरीतील एकूण १५ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे १,७०,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच विविध पोलीस ठाण्यातील एकूण ९ गुन्हे उघडकीस आणेल.