शरद पवारांची मोठी घोषणा…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा शरद पवार यांनी केली. शरद पवार यांच्या जीवनावरील ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत करण्यात आले. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करणार. नवीन समिती अध्यक्षपदाचा निर्णय घेईल, असेही शरद पवार म्हणाले.