ठाणे
जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक…

ठाणे – जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्या गुन्हेगारास कळवा पोलिसांनी अटक केली. सुनिल राजाराम कोरी असे याचे नाव आहे.
१ इसम शिवशक्ती नगर, घोलाई नगर परिसरात संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन सदर इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव सुनिल राजाराम कोरी असे सांगितले. त्याच्याजवळ १ गावठी कट्टटा तसेच ३ जिवंत काडतुस मिळून आले.
पोलिसांनी सदर प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.