दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक…

ठाणे – दरोड्याच्या गुन्ह्यातील एका आरोपीस ठाणे, मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पोलीस पथकाने अटक केली. बंटी उर्फ कृतिक दत्तात्रय सितापराव असे याचे नाव आहे.
कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटर सायकलवर जाणाऱ्या इसमांना रिक्षातून जाणाऱ्या अनोळखी इसमांनी अडवून त्यांना जबर मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल व पैसे काढून घेतलेबाबत कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल होता. तसेच सदर घटनेची व्हिडीओ क्लिप देखील व्हायरल झाली होती.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे बंटी उर्फ कृतिक दत्तात्रय सितापराव यास अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचा गुन्हा १) गोलू उर्फ आशिष अटवाल २) सचिन अरपाक राजोरीया ३) रितीक दत्तात्रय सितापराव ४) सागर ५) सुमित ६) अजिज या त्याच्या साथीदारांसोबत मिळून केला असल्याचे सांगितले.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, जय जीत सिंह, सह आयुक्त दत्ता कराळे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (गुन्हे), पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपुत (गुन्हे शोध २) यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वपोनिरी आनंद रावराणे, सपोनिरी जगदीश मुलगीर, पो.हवा रूपवंत शिंदे, पोहवा राजेंद्र घोलप, पोहवा राजाराम शेगर, पोहवा संदीप भालेराव, पोहवा अजित शिंदे, पोहवा नागराज रोकडे, पोहवा प्रशांत भुर्के व चालक पोअं सदन मुळे यांनी केली.