मुंबई
सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेला कारागीर अटक…

मुंबई – सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या कारागिरास कुर्ला पोलिसांनी अटक केली. सुदाम निमाई समन्ता असे याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ४९८ ग्रॅम सोन्याचे दागीने हस्तगत केले.
फिर्यादी मनोज जैन यांच्या सोन्याचे मंगळसूत्र बनविण्याच्या कारखान्यामधील कारागीर सुदाम निमाई समन्ता हा ४९८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने घेऊन पसार झाल्याबाबबत फिर्यादी मनोज जैन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बल भुसावळ यांच्या मदतीने भुसावळ स्टेशन परिसरातून सुदाम निमाई समन्ता यास अटक केली. तसेच त्याच्याकडून २८,००,०००/- किंमतीचे ४९८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.