ठाणे

महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणारे गजाआड…

ठाणे – एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी शिळ डायघर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शामसुंदर शर्मा, संतोषकुमार मिश्रा, राजकुमार पांडे अशी या तिघांची नावे आहेत.

मौजे शिळगाव येथील घोळ गणपती मंदिराच्या खालच्या बाजूस एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला. तपासादरम्यान, घोळ गणपती मंदिराचे गौशाळा व मंदिर परिसरात सेवा करणाऱ्या दोन सेवकांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि या गुन्ह्यात शर्मा नावाचा आणखी एक व्यक्ती सहभागी असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे पोलिसांनी शर्माचा शोध घेऊन त्याला चिता कॅम्प, ट्रॉम्बे परिसरातून अटक केली.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदर मृत महिला ही घरगुती वादविवाद असल्याने मानसिक तणावात होती. आणि ती घोळ गणपती मंदिरात आली असता ती परत न जाता घोळ गणपती मंदिर परिसरात रात्रभर थांबली त्यावेळी आम्ही तीघेसुद्धा तिथे होतो. दरम्यान, सदर महिला एकटी असल्याचा  फायदा घेऊन तिला भांगेच्या गोळया मिसळून चहा पिण्यास दिला. आणि महिलेने चहा पिल्यानंतर ती नशेमध्ये असताना तिच्यावर आम्ही तिघांनी बलात्कार केला. त्यानंतर शुद्धीत आल्यानंतर तिने आरडाओरड करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती म्हणून आम्ही तिला मारहाण केली. आणि तिचे डोके जमिनीवर आपटून तिचा गळा दाबून तिला जीवेठार मारले असल्याची माहिती समोर आली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, परिमंडळ १, सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, कळवा विभाग, शिळ डायघर पो.स्टे.चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिळ डायघर पो.स्टे. अंतर्गत पोनि/वरूडे (गुन्हे), तपास पथकातील स.पो.नि. महेश काळे, सपोनि अब्दुल मलीक, पोउपनि/संकेत शिंदे तसेच तपास पथकातील अंमलदार पोहवा वसावे, पोहवा राठोड, पोहवा पवार, पोहवा पाटील, पोहवा आव्हाड, पोना बोराडे, पोशि खाडे, पोशि सोनवणे व पो.ना./ समाधान माळी यांनी केली असून, गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/अब्दुल मलिक हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page