देश

अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर…

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांना हा अंतरिम जामीन ईडीने अटक केलेल्या प्रकरणात दिला आहे.

काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना सध्या तरी तुरुंगातच राहावं लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page