मुंबई

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी…

मुंबई – विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यात महायुतीचे ९ उमेदवार म्हणजेच सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

भाजपचे उमेदवार योगेश टीळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांचा विधानपरिषद निवडणुकीत विजय झाला आहे. या पाचही जणांना २६ मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव गर्जे यांना २४ आणि राजेश विटेकर यांना २३ मतं मिळाली असून, शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांना २५ मतं आणि भावना गवळी यांना २४ मतं मिळाली आहेत.

दरम्यान, आज सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत विधानसभेतील सक्रिय २७४ आमदारांनी गुप्त मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. विधानपरिषदेच्या ११जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page