मुंबई

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उद्या मतदान…

मुंबई – विधानपरिषदेच्या अकरा ११ जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. विधानसभेचे सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत. उद्या सकाळी ९ वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू होईल, आणि त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल. ११ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत बारा उमेदवार रिंगणात आहेत.

भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, तर शिवसेनेकडून कृपाल तुमाणे आणि भावना गवळी निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील हे रिंगणात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page