ठाणे
इराणी टोळीतील अट्टल गुन्हेगारास अटक…

भिवंडी – आंतरराज्यीत इराणी टोळीतील अट्टल गुन्हेगारास कोनगांव पोलीसांनी अटक केली. ऑनअली सर्फराज जाफरी असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून २ मोटार सायकल जप्त करून, २ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
कोनगांव पोलीस ठाणे हददीत गस्त करत असताना वासुदेव पाटील नगर, कोनगांव येथे पोलिसांना ऑनअली सर्फराज जाफरी हा संशयीतरित्या मोटार सायकलसह मिळून आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याच्याकडून कोनगाव पोलीस ठाणे हद्दीत चोरीस गेलेल्या २ मोटार सायकल जप्त करून ९५,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून २ गुन्हे उघडकीस आणले.