डोंबिवली

शिंदेंच्या नगरसेवकाची दादागिरी; महिला डॉक्टरसह 6 जणांना शिवीगाळ करत मारहाण…

dombivali – एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकाने महिला डॉक्टरसह 6 जणांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील एका महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि तीन नर्सना मारहाण केली. मारहाण करत असल्याचे CCTV फुटेज समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर बाळाला जन्मानंतर एनआयसीयू उपचारांची आवश्यकता भासू शकते, याची माहिती डॉक्टरांनी संबंधित कुटुंबीयांना दिली.

मात्र, रुग्णालयातील सर्व एनआयसीयू बेड भरले असल्याने संबंधित महिलेला अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. याच कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर मारहाणीची घटना घडली.

दरम्यान, या घटनेनंतर हॉस्पिटलमधील नर्स आणि कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page