डोंबिवली
dombivali : कैलास लस्सी दुकानाला आग!…

dombivali – डोंबिवली स्टेशन परिसरातील प्रसिद्ध कैलास लस्सी स्वीट मार्ट दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे.
सोमवारी सकाळच्या सुमारास कैलास लस्सी स्वीट मार्ट’च्या पहिल्या मजल्यावरील किचनला हि आग लागली त्यावेळी किचनमध्ये काम करणाऱ्या ७ ते ८ कर्मचाऱ्यांनी खिडकीतून बाहेर पडून स्वतःची सुटका करून घेतली.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून दुकानाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने अग्निशमन दलाने वेळेत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
माहितीनुसार, किचनमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरु असताना अचानक आग लागली कर्मचाऱ्यांनी तात्काळ खिडकीतून बाहेर पडून स्वतःची सुटका करून घेतली. तसेच घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.



