डोंबिवली

dombivali : मानपाडा वपोनि संदीपान शिंदे यांचे अजूनही निलंबन नाही…

dombivali – मानपाडा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांना निलंबित करण्यात यावे या संदर्भातील पत्र लक्ष्मण हजारे आणि युवराज सुर्ले यांनी गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक कार्यालयात दिले आहे. सदर अर्ज देऊन अनेक दिवस उलटूनही अजूनही वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांना निलंबित करण्यात आलेले नाही.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्हांच्या बाबतीत कारवाई करण्यास संदीपान शिंदे कुचकामी ठरत असल्याचे लक्ष्मण हजारे आणि युवराज सुर्ले यांचे म्हणणे आहे. अनेक गंभीर गुन्हे मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल होतात.

पान टपरी चालकाला मारहाण, अनधिकृत स्टॉलवर कारवाई कारण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मारहाण तसेच महिलेवर विनयभंग केल्याप्रकरणी केडीएमसी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असून, अशा प्रकारे अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असून, यांच्यावर कोणतीही कारवाई नाही आरोपींना अटक नाही. यात पान टपरी चालकाला मारहाण होऊन महिना उलटला आहे. अजूनही आरोपी मोकाट आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम गुन्हे घडतात आणि आरोपी मोकाट सुटतात. त्यांना कायद्याचे भय उरलेले नाही आणि याला कारण म्हणजे निष्क्रिय, कामात कसूर करणारे संदीपान शिंदे. त्यांच्यामुळे आरोपी बिनधास्त आहेत आणि गुन्हे करत आहेत.

संदीपान शिंदे हे स्थानिक राजकारण्यांच्या दबावाखाली काम करतात. त्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करून शिंदे यांनी कायद्याची ऐशी कि तैशी करून ठेवली आहे.

मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक डान्स बार आहेत. या सर्व डान्स बारमध्ये पैशाची खुले आम उधळन केली जाते. या बारमध्ये रात्री उशीरा पर्यंत मुलीचे अश्लील नृत्य चालू असते. तसेच अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे, मटका, ऑनलाईन, लॉटरी, चरस गांजा, गावठी दारू धंदे आणि लॉजवरती देह विक्री व्यवसाय चालू आहेत. स्पा सेंटरच्या नावाखाली सर्रास वेश्या व्यवसाय चालू आहेत तरीही या सर्व अवैध धंद्यांवर वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे कारवाई करत नाहीत. यासंदर्भात तक्रार केली असता दखल घेतली जात नाही.

त्यामुळे अशा निष्क्रिय, स्थानिक राजकारण्यांच्या दबावाखाली काम करणारे, कर्तव्यात कुचराई करणारे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांना निलंबित करण्याची मागणी लक्ष्मण हजारे आणि युवराज सुर्ले यांनी केली असून, त्यांच्याजागी महिला पोलीस अधिकारी किंवा सिंघम स्टाईलने काम करणारे पोलीस अधिकारी यांची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page