डोंबिवली

dombivali – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने डोंबिवलीत ढाबे चालू…

dombivali – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने डोंबिवली परिसरात खुलेआम दारू विक्री, अनधिकृतरित्या दारू पिऊ देणे हे प्रकार चालू आहेत.

डोंबिवली परिसरात अनेक ढाबे आहेत. या ढाब्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना या ठिकाणी दारू पिण्याचे प्रकार चालू असून, डोंबिवली राज्य उत्पादन शुल्क विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी काळे यांच्याकडे लक्ष्मण हजारे आणि युवराज सुर्ले यांनी महिनाभरापूर्वी यासंदर्भात तक्रार केली आहे. पण अजूनही या ढाबे किंवा अनधिकृतरित्या दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही.

तक्रार केली असता काळे यांच्याकडून उडवा-उडवीची उत्तर मिळत आहेत. ढाबेवाले लोक गुंड असतात, पैसेवाले असतात, त्यांचे नातेवाईक राजकारण्यांशी संबंधित असतात. त्यामुळे अशा माणसांवरती कारवाई करता येत नाही. असे काळे यांचे म्हणणे आहे.

गंभीर प्रश्नांकडे विभागाचे लक्ष नाही. अधिकारी कर्मचारी यांचे मस्त असे चालू आहे. ‘मारो दम मिटे गम, ढाबेवाले कमायेंगे और खायेंगे हम‘ असं काहीतरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चालू आहे असे दिसते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page