मुंबई
टिटवाळ्यात ५ कोटींचे ड्रग्ज जप्त…

mumbai – मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने टिटवाळा येथे मोठी कारवाई करत ५ कोटी ७ लाख रुपये किंमतीच्या एक्स्टेसी (MD) गोळ्यांसह एका महिलेला अटक केली आहे. अश्विनी पॉल असे या महिलेचे नाव असून, तिच्या टिटवाळ्यातील घरातून तिला अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने आधी साकीनाका येथून 200 गोळ्यांसह इरफान अन्सारीला पकडले, त्यानंतर सुफियानला अटक केली आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून टिटवाळा येथील पद्मावती सोसायटीमध्ये छापा टाकून घराच्या झडतीमध्ये ४,०५६ एमडी (एक्स्टेसी) गोळ्या जप्त केल्या याचे वजन एकूण वजन २ किलो ३०० ग्रॅम इतके आहे. या गोळ्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ५ कोटी ७ लाख रुपये आहे.



