डोंबिवली

dombivali : बकरा दिला नाही म्हणून कुटुंबाला मारहाण…

dombivali – जत्रेसाठी बकरा दिला नाही म्हणून एका कुटुंबातील तीन जणांना मारहाण करण्यात आल्याची घटना डोंबिवली पश्चिमेला घडली असून, याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत गावदेवीची जत्रा सुरू असून, सुजल भोसले हा बकरा घेण्यासाठी आशिष दळवी जे कि त्यांचा तबेला आहे त्यांच्याकडे आला होता. त्यावेळी आशिष यांनी उद्या सकाळी तू बकरा घेऊन जा असे सांगितले.

आशिष विठ्ठल दळवी यांचा तबेला आहे. त्यांच्या तबेल्यात बकरी आणि म्हशी आहेत. परिसरात जत्रा सुरू असल्याने नागरिकांनी उत्साहात जत्रा साजरी केली. मात्र रात्री अडीच वाजताच्या सुमारास आशिष दळवी यांच्या तबेल्यात सुजल भोसले नावाचा तरुण आला. परंतु या गोष्टीचा सुजलला राग आला.

दरम्यान, काही वेळाने सुजल भोसले त्याचा मित्र विनय हेगडे, प्रमोद ठाकरे, यज्ञेश खंडागळे, अक्षय खंडागळे आणि अन्य दोन साथीदारांसोबत पुन्हा आला. आणि त्याने मित्रांच्या साथीने आशिषला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत आशिषची आई आणि मोठा भाऊ देखील जखमी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page