४५१ अवैध गॅस सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त…

mumbai – मुंबईतील शिधावाटप यंत्रणेने अवैध गॅस साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम यशस्वी केली आहे. नागरी पुरवठा नियंत्रक, शिधावाटप व संचालक चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि त्यांच्या विशेष आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत वाडीबंदर ब्रीज, डोंगरी परिसरात अवैध गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ८ गाड्यांसह ४५१ सिलिंडर असा एकूण ४०,६१,७१६ /- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नियंत्रक, शिधावाटप व संचालक चंद्रकांत डांगे यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार किंवा अवैध साठवणूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही आणि अशा प्रकारची कठोर मोहीम भविष्यातही सुरू राहील.
या मोहिमेसाठी वाडीबंदर ब्रीज, डोंगरी परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली.



