dombivali : १० ई वार्डच्या लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी…

dombivali – डोंबिवलीतील १० ई वार्डच्या एका अधिकाऱ्याने एका महिला कर्मचाऱ्याकडे शारीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भूषण पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव असून, केडीएमसी तो वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत आहे. दरम्यान, या प्रकरणाची केडीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून देखील भूषण पाटील याच्या विरोधात कोणतीही कारवाई न झाल्याने सदर महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भूषण पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला आणि भूषण पाटील यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर भूषण पाटील याने या महिलेला फोनद्वारे त्रास देण्यास सुरुवात केली. आणि शरीर सुखाची मागणी केली. सदर प्रकार महिलेने वरिष्ठांना सांगितला. मात्र वरिष्ठांकडून भूषण पाटील याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर या कर्मचारी महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी भूषण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होऊन १० ते १५ दिवस झाले असून, अजूनही भूषण पाटील याला मानपाडा पोलिसांनी अटक केलेली नाही. इतका गंभीर गुन्हा असून पोलीस आरोपीला का अटक करत नाहीत हा प्रश्न सर्वांना पडला आहे? याठिकाणी एखादा सामान्य माणसावर गुन्हा दाखल झाला असता तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता आणि इकडे गुन्हा दाखल होऊन १० ते १५ दिवस झाले तरी इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या नाकावर टिच्चून मोकाट फिरत आहे. भूषण पाटील याला नेमकं कोण वाचवत आहे? म्हणजे सामान्य माणसाला एक न्याय आणि पालिका कर्मचाऱ्यांना एक न्याय असे पोलीस करत आहेत काय?
एक पालिका अधिकारी महिला कर्मचाऱ्याला बिधास्त शरीर सुखाची मागणी करतो. इतकी हिम्मत येते कुठून? डोंबिवलीत हे काय चाललंय? ”लाडक्या बहिणीची सुरक्षा” प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, भूषण पाटील याच्या भावाचे राजकीय हितसंबंध असल्याने भूषण पाटील याला मानपाडा पोलीस अटक करत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


