कल्याण पूर्व-पश्चिम जोडणारा स्व. आनंद दिघे पूल १० दिवस बंद…

kalyan – कल्याण पूर्व पश्चिम भाग जोडणाऱ्या दिवंगत आनंद दिघे उड्डाण पुलावरील रस्त्यावर डांबरीकरणाच्या पुनर्पृष्ठीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत पूल वाहतुकीसाठी पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी या पूल आणि वाहतूक बंदबाबतची अधिसूचना काढली आहे.
शहा इंजिनिअर कंपनीकडून आनंद दिघे उड्डाण पुलावर डांबरीकरणाच्या पुनर्पृष्ठीकरणाचे काम केले जाणार आहे. आनंद दिघे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असला तरी पर्यायी रस्ते मार्गाने वाहतुकीसाठी वाहतूक विभागाने व्यवस्था केली आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचा अवलंब करून, शिस्तीने या पर्यायी रस्ते मार्गाने वाहने न्यावीत असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
प्रवेशबंदी आणि पर्यायी मार्ग…
१) कल्याण पूर्व – कल्याण पश्चिम (आनंद दिघे ब्रिज मार्गे)
स्व. आनंद दिघे ब्रिजकडे जाणाऱ्या सर्व वाहने प्रवेशद्वारावरून प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग: पुणे लिंक रोड – मक्कीनाका मार्गे किंवा पुणे लिंक रोड – श्रीराम चौक मार्गे पुढील प्रवास.
२) कल्याण पश्चिम – कल्याण पूर्व (सम्राट चौक – वालधुनी ब्रिज मार्गे)
सम्राट चौक येथे आनंद दिघे ब्रिजकडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळणणे बंद.
पर्यायी मार्ग: सम्राट चौक – सरळ पुढे – छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, शांतीनगर – श्रीराम चौक मार्गे पुढील प्रवास.
३) उल्हासनगर – कल्याण पूर्व (सम्राट चौक मार्गे)
शांतीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग: प्रवेशद्वारातून डावीकडे वळून श्रीराम चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
२५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १२:०१ ते ४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२:०० पर्यंत निर्बंध लागू राहतील. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर सेवा, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांची वाहने या निर्बंधातून मुक्त राहतील.पूल दुरुस्ती दरम्यान वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी विनंती वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बालवडकर यांनी केली आहे.



