डोंबिवली : पलवा सिटीजवळ सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह…

dombivali – प्रसिद्ध पलावा सिटी समोरील खाडीमध्ये एका सुटकेसमध्ये २५ वर्षीय तरुणीचा कोंबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली. डायघर परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील प्रसिद्ध पलावा सिटी समोरील खाडीमध्ये ही सुटकेस आढळली होती. खाडीच्या बाजूला स्थानिक लोकांना सुटकेस आढळली. सुटकेसमधून दुर्गंधी येत असल्यामुळे स्थानिकांनी संशय आला त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुटकेस उघडून पाहिली असता आतमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. या तरुणीवर अत्याचार करुन तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने सुटकेसमध्ये मृतदेह कोंबला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.



