कल्याणमध्ये अवैध गेम झोनवर कारवाई…

kalyan – कल्याण पूर्वेत जॉयस्टीक जंगल या नावाने सुरु असलेल्या अवैध गेम झोनवर कोळसेवाडी पोलिसांनी कारवाई केली असून, याप्रकरणी पोलिसांनी गेम झोन चालविणाऱ्या तिघांना अटक केली आहे. पृथ्वीराज चवान, श्रीराम चवान, अमित सोनावणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या गेम झोनमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्याने पोलिसांनी हि कारवाई केली.
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागात जिरे टोप रस्त्यावर डाॅमिनोजचे बाजुला असलेल्या एका इमारतीच्या गाळ्यात बेकायदेशीरपणे गेम झोन चालविले जात आहे तसेच या ठिकाणी अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुषंगाने डिसीपी (डिकॅप) अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोनि (गुन्हे) गणेश न्हायदे, सपोनि दर्शन पाटील आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी गेम झोनवर छापा टाकला असता त्याठिकाणी १८ वर्षा वया खालील अल्पवयीन मुलं-मुली हे कॉम्युटरवर गेम खेळत असताना दिसून आले. तसेच सदर गेमझोन मध्ये ग्राउंड फ्लोरला एक बंद प्रायव्हेट रुम होता व त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था, व्हेन्टीलेशनची व्यवस्था, फायर सुरक्षा उपकरण, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी उपायोजना केले नसल्याचे निदर्शनास आले. आणि कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हे गेम झोन सुरु करण्यात आले असल्याने पोलिसांनी या गेमझोनवर कारवाई करत तीन जणांना अटक केली. सदर प्रकरणी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, अशा प्रकारे अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या Gaming Zone वर कारवाई सुरू रहाणार आहे. तसेच पालकांनी सुध्दा याबाबत सर्तक राहून मुलांवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. असे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.



