कल्याणमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा आयशर पकडला…

kalyan – अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा आयशर कल्याण गुन्हे शाखा युनिट ३ ने गांधारी ब्रिज चौक येथे पकडला. या कारवाईत पोलिसांनी एकास अटक करून ८७,३७,४७२/रू. चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गुजरात राज्यातून आयशर मधून (आयशर नंबर : GJ. 19. Y. 3330) महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीरित्या वाहतूक करून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्याआधारे पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील गांधारी ब्रिज चौक येथे सापळा रचून धनराज स्वामी याला आयशरसह ताब्यात घेतले. सदर इसम आयशर मधून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीरित्या वाहतूक करताना मिळून आला.
सदर प्रकरणी पोलिसांनी अवैध गुटखा, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि आयशर असा एकूण ८७,३७,४७२/रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच धनराज स्वामी याच्यावर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहा.पो.निरी.सर्जेराव पाटील, पोउपनिरी विनोद पाटील, पोउपनिरी किरण भिसे, सपोउपनिरी दत्ताराम भोसले, सपोउपनिरी बालाजी शिंदे, पोहवा/सपोउपनि बोरकर, पोहवा/सुधीर कदम, पोहवा/विजय जिरे, पोहवा/प्रशांत वानखेडे, पोहवा/सचिन भालेराव, पोहवा/गोरक्षनाथ पोटे, पोहवा/विलास कडु, पोहवा/आदिक जाधव, पोहवा पांडुरंग भांगरे, पोहवा/उल्हास खंदारे, पोहवा/सचिन कदम, पोना/प्रविण किनरे, पोना/दिपक महाजन, पोशि/मिथुन राठोड, पोशि/सतिश सोनवणे, पोशि/गुरूनाथ जरग, पोशि/विनोद चन्ने पोशि/गणेश हरणे, पोशि/गोरक्ष शेकडे, सर्व नेम, गुन्हे शाखा, घटक – ३, कल्याण यांनी केली आहे.



