डोंबिवली
डोंबिवलीत रिक्षा चालकावर चाकूने हल्ला…

डोंबिवली – रिक्षा चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवली पूर्वेतील स्टेशन जवळील इंदिरा चौकात घडली असून या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. सिताराम शेवाळे असे या रिक्षाचालकाने नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, रिक्षाचालक सिताराम शेवाळे डोंबिवली पूर्वेतील स्टेशन जवळील इंदिरा चौकात आले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या २ इसमांनी या रिक्षाचालकाला टपली मारली. रिक्षाचालकाने या दोघांना याबाबत जाब विचारला असता या दोघांनी सिताराम यांना मारहाण केली आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला. यात सिताराम हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.