कल्याण, डोंबिवली, बदलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी…

kalyan – कल्याण शीळ रोडवरील एक्सपिरिया मॉल, लोढा पलावा येथे भारतीय रेल्वे प्रशासनाकडून DFCC प्रकल्पाचे काम ६ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झालेले असून निळजे रेल्वे ब्रिज वाहतुकीस बंद झालेला आहे. तरी नागरिकांनी पर्यायी वाहतूक मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी केले आहे.
तसेच जे नागरीक / वाहन चालक कल्याण शीळ रोडवर विरुद्ध दिशेने वाहने चालवून वाहतुकीस अडथळा करतील त्यांच्याविरुद्ध उद्देश पूर्वक, धोकादायक रित्या विरुद्ध दिशेने सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालविणे, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर इतर व्यक्तींना जाण्यासाठी अटकाव करणे, व्यक्तींना गैरपणे निरुद्ध करणे, इतर वाहन चालकांना विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास अप्रेरणा देणे, रस्ता सुरक्षा मानकांचा भंग करणे इ. बाबत BNS 2023 चे कलम 54, 126(2), 281, 285 सह MVDR 4/122, 177(A), 184/177 MVA सह रस्ता सुरक्षा मानके नियम कलम 190(2) अन्वये फौजदारी खटले दाखल करण्यात येतील असेही सांडभोर म्हणाले.