संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरेंची आत्महत्या…
pune – संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शिरीष महाराज मोरे यांनी देहू येथील निवासस्थानी आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र, बुधवारी सकाळी बराचवेळ होऊनही त्यांनी दार उघडले नव्हते. दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळफास लावून घेतला.
त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.