मुंबई
परराज्यातील अवैध मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई….

mumbai – ठाणे जिल्ह्यातील मुंबई – नाशिक महामार्ग, सोनाळे गावच्या हद्दीत एच.पी पेट्रोल पंपाजवळ (ता. भिवंडी) परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत गोवा राज्यात निर्मित महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्की ब्रॅण्ड मद्याचे १४०० बॉक्स अर्थात १८० मि.ली क्षमतेच्या ६७ हजार २०० बाटल्या दारूबंदी कायद्यातंर्गत जप्त करण्यात आल्या.
सहा चाकी वाहनासह, एक मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ७२ लाख ९४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या प्रकरणी श्रवणकुमार कृष्णराम पंवार यास अटक करण्यात आली आहे.



