लॅपटॉप चोरी करणारा गजाआड…

kalyan – लॅपटॉप चोरी करणाऱ्यास कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सुजल वाघचौरे याचे नाव असून, पार्किंगमध्ये असलेल्या गाडीची काच फोडून त्याने लॅपटॉप चोरी केला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेजेन्सी पार्क, चक्की नाका कल्याण पूर्व येथे पार्क करून ठेवलेल्या एका गाडीची कोणीतरी अज्ञात इसमाने काच फोडून गाडीत ठेवलेला लॅपटॉप चोरी केला असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. तसेच आजुबाजुच्या इतर गाडयांच्या देखील काचा फोडून नुकसान केले होते.
दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गु.रजि.नं. ४८/२०२६ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०५ (व), ३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुजल वाघचौरेला अटक केली. आणि त्याच्याकडून गुन्हयातील चोरीस गेलेला १८,०००/- रू. किमंतीचा लॅपटॉप हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण अतुल शेंडे, व सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव व पोनि गुन्हे गणेश न्हायदे यांच्या सुचनेप्रमाणे सहा पो निरी संदिप भालेराव, पोहवा विशाल वाघ, दत्तु जाधव, गोरखनाथ घुगे, रोहीत बुधवंत, विलास जरग, पोना दिलीप कोती यांनी केली आहे.



