ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार…
mumbai – वांद्रे टर्मिनस येथे उभ्या असलेल्या एका एक्स्प्रेस ट्रेनच्या रिकाम्या गार्ड डब्यात महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हरिद्वारहून ५५ वर्षीय महिला तिच्या नातेवाईकासह वांद्रे टर्मिनस येथे उतरली. त्यानंतर तिचे नातेवाईक काही कामानिमित्त स्टेशन बाहेर गेले होते. त्यावेळी हि महिला प्लॅटफॉर्मवर थोडा वेळ झोपली होती. मात्र झोप अनावर होत असल्याने ती समोर उभ्या असलेल्या रिकाम्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये जाऊन झोपली.
त्यावेळी त्या ठिकाणी काम करत असलेल्या हमालाने तिला पाहिले. थोड्या वेळाने तो हमाल ट्रेनमध्ये शिरला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हमाल तिथून पळून गेला.
दरम्यान. महिलेने नातेवाईक आल्यानंतर घडलेली घटना सांगितली. नातेवाईकांनी ताबडतोब रेल्वे पोलिसांना सदर घटना सांगितली असता, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे हमालाचा शोध घेत त्याला अटक केली.