नवी दिल्ली

ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर ठाकरे गटाच्या खासदारांचे स्पष्टीकरण…

new delhi – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर ची चर्चा सुरु आहे. या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकूण ९ खासदारांपैकी ६ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेला आता ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला आहे.

आमची वज्रमूठ मजबूत आहे. टायगर जिंदा आहे. टप्प्प्याटप्प्याने त्यांच्यातीलच एक माणूस आमदार घेऊन भाजपकडे जाणार होता. पुन्हा आमच्या खासदार आणि त्यांच्या निष्ठेबद्दल मन कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा निषेध करतो. हे लोकं कठिण प्रसंगात राहिलेले हे खासदार आहेत. काही चढउतार होऊ द्या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत असे लोकसभा खासदार अरविंद सावंत म्हणाले.

मुळात ज्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्यांचं सरकारमध्ये आपापसात गंभीर वाद सुरू आहेत. यावेळी लक्ष वळवण्याचे प्रयत्न केलं जात आहेत. त्या प्रयत्नांनुसार जाणीवपूर्वक आज सकाळी सात वाजल्यापासून कोणीतरी बातम्या सोडल्या आहेत. सरकारमध्ये येऊन सुद्धा रोज नवीन-नवीन बातम्या दिल्या जात आहेत. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत. अशा बातम्या सातत्याने दिसत असल्याने मुद्दाम ही पुडी सोडण्यात आलेली आहे असेही सावंत म्हणाले.

दरम्यान, या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यासह ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, अनिल देसाई, संजय जाधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page