घरफोडी करणाऱ्यास अटक; १ लाखांचे दागिने हस्तगत…
डोंबिवली – घरफोडी करणाऱ्या एकास डोंबिवली पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून १ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. आकाश मोरे याचे नाव आहे.
डोंबिवली पूर्वेतील तुकाराम नगर येथील बिल्डिंग मधील एका घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून त्या घरातील एकूण १,६४, ८० रू. किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घरफोडी चोरी करून नेले असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आकाश मोरेला अटक करून त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले.
सदरची यशस्वी कामगिरी सुहास हेमाडे, सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, गणेश जवादवाड, व.पो.नि. (गुन्हे) पंकज भालेराव, डोंबिवली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरी. केशव हासगुळे, पोहवा. विशाल वाघ, पोहवा सचिन भालेराव, पोहवा प्रशांत सरनाईक, पोहवा दत्तात्रय कुरणे, पोहवा लोखंडे, पोना कोळेकर, पोना दिलीप कोती, पोशि देविदास पोटे, पोशि शिवाजी राठोड, पोशि मंगेश वीर यांनी केली आहे.