डोंबिवली
शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील यांची भाजपमध्ये घरवापसी…

dombivali – शिंदेंच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश पाटील यांनी आज भाजपमध्ये घरवापसी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी नगरसेविका सायली विचारे यांनी देखील पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला.
कल्याण डोंबिवलीत भाजपमध्ये आज सकाळपासूनच जोरदार इनकमिंग चालू आहे. शिवसेनेचे युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला तर काही वेळातच महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.



