कल्याण गुन्हे शाखेची कारवाई; पिस्टल, काडतुसे, शस्त्रे जप्त; एकास अटक…

dombivali – पिस्टल, काडतुसे, घातक शस्त्रे विनापरवाना बेकायदेशीररीत्या विक्रीकरीता घरात लपवून ठेवलेल्या सराईत गुन्हेगारास कल्याण गुन्हे शाखा युनिट ३ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एकूण २ लाखांचा तलवार, पिस्तुल, काडतुसे, खंजिर, चाकू, सुरा असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला. रोशन हिरानंद झा असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. डोंबिवली जवळील २७ गावांमधील देसलेपाडा परिसरात पोलिसांनी हि कारवाई केली.
येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कल्याण गुन्हे शाखा युनिट ३ कडून घातक शस्त्रे, अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेऊन असतानाच डोंबिवली जवळील देसलेपाडा भागात एका व्यक्तीजवळ तलवार, पिस्तुल, खंजिर, चाकू, सुरा असा मोठा शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखा घटक ३ पथकाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळाली होती.
त्याअनुषंगाने पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून रोशन हिरानंद झा याला अटक केली आणि त्याने घरात लपवलेली ३ गावठी बनावटीचे पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, २ रिकामी मॅगझिन तसेच १ धारदार लोखंडी खंजिर, २ धारदार चाकू, १ लोखंडी धारदार तलवार अशी एकूण २.१२,५००/- रूपये किमंतीची विनापरवाना अग्निशस्त्रे व इतर घातक शस्त्रे जप्त केली. सदर प्रकरणी रोशन हिरानंद झा याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर व शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहा.पो.निरी. सर्जेराव पाटील, सहा.पो.निरी. बळवंत भराडे, पोउपनिरी विनोद पाटील, पोउपनिरी किरण भिसे, सपोउपनिरी दत्ताराम भोसले, सहा.पो.उप निरी. बालाजी शिंदे, पोहवा/सपोउपनि बोरकर, पोहवा/सुधीर कदम, पोहवा/विजय जिरे, पोहवा/प्रशांत वानखेडे, पोहवा/सचिन भालेराव, पोहवा/गोरक्षनाथ पोटे, पोहवा/विलास कडु, पोहवा/आदिक जाधव, पोहवा/भांगरे, पोहवा/खंदारे, पोना/प्रविण किनरे, पोना/दिपक महाजन, पोशि/सतिश सोनवणे, पोशि/गुरूनाथ जरग, पोशि/गणेश हरणे, पोशि/गोरक्ष शेकडे, पोशि/जालिदंर साळुंखे यांनी केली आहे.



