महाराष्ट्र
पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात!..

pune – पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात घडला असल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर आग लागली. या घटनेमध्ये ३ ते ४ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माहितीनुसार, साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर गावगाडा हॉटेलसमोर संध्याकाळी हा अपघात झाला. जिथे दोन कंटेनर एकमेकांना धडकले. या धडकेनंतर एका कंटेनरला भीषण आग लागली.

अपघाताची भीषणता इतकी होती की, आगीच्या मोठ्या ज्वाला दूरवरून दिसत होत्या. दरम्यान, या घटनेमुळे पुणे-बंगळूरू मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.



