गहाळ झालेले ५ लाखांचे मोबाईल तक्रारदारांना केले परत…

dombivali – गहाळ झालेले एकूण ३३ मोबाईल डोंबिवली पोलिसांनी शोधून तक्रारदारांना परत केले. डोंबिवली पोलीस ठाण्यात दाखल प्रॉपर्टी मिसिंग मधील एकूण 5,50,000/- रुपये किंमतीचे एकूण 33 मोबाईल CEIR पोर्टल द्वारे शोध घेऊन हस्तगत करण्यात आले आहेत.

DCP अतुल झेंडे आणि ACP सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि गणेश जवादवाड, पोनि गौड,पोनि भालेराव यांच्या हस्ते सदरचे मोबाईल तक्रारदारांना पोलीस स्टेशन डोंबिवली येथे परत करण्यात आले. हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रादारांनी समाधान व्यक्त केले. तसेच डोंबिवली पोलिसांचे आभार मानले.
सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी अच्युत मुपडे, पोउपनि चव्हाण पोशि सांगळे तपास पथक यांनी केली आहे.



