डोंबिवली

डोंबिवली : वारंवार तक्रार करूनही हेदुटणे गावातील अनिधकृत गाळे व रूमवर कारवाई नाही…

dombivali – डोंबिवली पूर्वेतील हेदुटणे गावात अनिधकृत गाळे व रूम बांधण्यात आले असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या १०/ ई प्रभाग कार्यालयात वारंवार तक्रार अर्ज करून देण्यात आली असून, अजूनही या अनिधकृत गाळे व रूमवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत गंगाराम काळे यांनी वारंवार १०/ ई प्रभाग कार्यालयात तक्रार अर्ज दिला आहे. पण अद्यापही कारवाई करण्यात आली नाही.

हेदुटणे गाव मुख्य कमानीच्या थोड्या अंतरावर हे अनिधकृत गाळे व रूम बांधण्यात आले आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे या अनधिकृत गाळ्यात शासकीय दवाखाना आहे.

दरम्यान, यासंदर्भात आता १०/ ई प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांना निलंबित करण्याची मागणी होत आहे. आरपीआयचे जिल्हा सचिव अनिल खैरनार यांनी हि मागणी केली आहे. सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांना प्रत्यक्ष भेटून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास विनंती केली आहे. तरीही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. असे अनिल खैरनार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे याची दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा अनिल खैरनार यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page