ठाणे
रुग्णालयाच्या आवारात अल्पवयीन मुलीचा विनयभंग…

Thane – कळवा रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग करणाऱ्या एकाला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप शेळके असे याचे नाव असून, मिळालेल्या माहितीनुसार, वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने प्रदीपला सुरक्षा रक्षक आणि डॉक्टरांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
हि मुलगी आईसोबत रुग्णालयाच्या आवारात उभी होती. त्यावेळी प्रदीपने त्या मुलीला त्या ठिकाणच्या उद्यानात नेले. तेथे तो मुलीशी अश्लील चाळे करत असताना ही बाब एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या निदर्शनास आली.
त्यांनी ताबडतोब हि माहिती डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी तात्काळ रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना बोलावून प्रदीपला चोप देत ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.