नवी मुंबई

धावत्या लोकलमधून महिला पडली; जीव वाचला पण…

navi mumbai – धावत्या लोकलमधून एका महिला पडली असल्याची घटना सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकात घडली असून, या घटनेत या महिलेचा जीव वाचला परंतु तिचे दोन्ही पाय तुटले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकात येत होती. त्यावेळी स्थानकात गर्दी होती. तेव्हा एक महिला पाय घसरून रूळावर पडली. आणि तिच्या अंगावर रेल्वे गेली. या घटनेत महिलेचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, प्रवाशांनी तातडीने या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page