महाराष्ट्र

महिला वाहतूक पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न…

pune – पुण्यामध्ये महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घ़डली आहे. फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल रात्रीच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना ही घटना घडली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, पोलिसांनी आरोपी संजय साळवे याला अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशन समोर ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाई सुरू होती. त्यावेळी महिला पोलिसाने संजयला अडवलं आणि त्याची चौकशी सुरू केली. मात्र तेवढ्यात त्याने महिला पोलिसावर पेट्रोल टाकत तिला जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी आरोपीला रोखले आणि महिला पोलिसाला वाचवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि महिला पोलिसाचाही जीव वाचला.

दरम्यान, याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संजय फकिरा साळवे याला अटक केली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page