मुंबई
मुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस…

मुंबई – मुंबईसह उपनगरात आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. काही भागात पाणी साचले आहे. कुलाबा, सांताक्रूझ, दहिसर, राममंदिर, विक्रोळी, चेंबूर, शीव, माटुंगा याठिकाणी देखील पावसाने जोरदार बॅटिंग केली.
दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं आज दमदार पाऊस पडला. धरण क्षेत्रांतही दमदार पाऊस झाला. मध्य वैतरणा, मोडकसागर धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
आज आलेल्या पावसाने पुन्हा एकदा नागरिकांची तारंबळ उडाली. दरम्यान, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर, रविवारी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.