ठाणे

मध्य रेल्वेवर मोठा अपघात; ६ जणांचा मृत्यू…

thane – मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा दरम्यान लोकल मधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घटना घडली आहे. या घटनेत काही प्रवासी जखमी देखील झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कसाराकडून सीएसएमटीकडे जाणारी आणि सीएसएमटीकडून कसाराकडे जाणारी अशा २ फास्ट लोकल दिवा – मुंब्रा दरम्यान एका वळणावर एकमेकांच्या शेजारून जाताना दोन्ही लोकलमधले लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले. त्यानंतर हे प्रवाशी दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या मध्ये असलेल्या जागेत पडले.

या घटनेत १३ प्रवासी खाली पडले आणि यातल्या ६ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page