POP मूर्तींबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय…

mumbai – पीओपी गणेश मूर्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली आहे. मात्र मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून, काही अटी घातल्या आहेत.
कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये पीओपी मूर्तीचे विसर्जन करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबत आता राज्य सरकारला विवेकबुद्धी वापरावी लागेल आणि निर्णय घ्यावा लागेल, असंही खंडपीठाने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, पीओपी मूर्ती तयार करता येतील. परंतु नैसर्गिक जलसाठ्यात विसर्जित करता येणार नाहीत. सीपीसीबी समितीने असे म्हटले आहे की, अशा मूर्ती फक्त कृत्रिम जलसाठ्यात विसर्जित केल्या जाऊ शकतात’, अशी शिफारस केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ञ समितीने केली.