डोंबिवली

एम.डी. अंमली पदार्थासह एकास अटक…

dombivali – एम.डी. अंमली पदार्थासह एकास डोंबिवली पूर्वेतून अटक करण्यात आली आहे. अब्दुल रहमान कुर्बान अली शेख असे याचे नाव असून, त्याच्या ताब्यातून २२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) अं.कि. ४४,०००/- अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.
परिमंडळ ३ कल्याण विशेष कारवाई पथक आणि टिळकनगर पोलिसांनी संयुक्तरित्या हि कारवाई केली आहे.

कल्याण व डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणारे पेडलर यांच्यावर कारवाई करण्याकरीता पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण यांचे विशेष कारवाई पथक आणि टिळकनगर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ९० फुट रोड, कचोरे, डोंबिवली पूर्व येथून अब्दुल रहमान कुर्बान अली शेख याच्याकडून २२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हस्तगत करून त्याला अटक केली. तसेच त्याच्याविरूध्द टिळकनगर पोलीस ठाणे गु.रजि.न. ॥ ४३७/२०२५, गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधि. १९८५ चे कलम २२ (ब), ८ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page