चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने केली अटक…

डोंबिवली – चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. विरेंद्र नाटेकर आणि प्रेम दुवा अशी या दोघांची नावे आहेत. दोन इसम चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या बाहेरील परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक ३ चे पोहवा दत्ताराम भोसले यांना मिळाली होती.
त्यानुषांगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पुणे लिंक रोड, विठ्ठलवाडी बस डेपोसमोर सापळा रचून चोरीचे मोबाईल विक्री करीता घेऊन आलेल्या विरेंद्र नाटेकर, प्रेम दुवा यांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ६२,०००/- रू. किमंतीचे ६ स्मार्टफोन मोबाईल आणि १ टॅब असा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सदरचे मोबाईल त्यांचा मित्र फिरोज खान उर्फ मोनु याने डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्यावर असणाऱ्या एका मोबाईलच्या दुकानावर मागून भिंती वरून चढून वरील पत्रा उचकटून आत जाऊन आतील छताची पिउपी कशाने तरी तोडून मोबाईल दुकानात प्रवेश करून मोबाईल चोरी केले केले असल्याचे सांगितले.
दरम्यान,सदर प्रकरणी राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिरोज खान हा फरार आहे. त्याचा कल्याण गुन्हे शाखा शोध घेत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व निलेश सोनावणे सहा. पोलीस आयुक्त, (शोध १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिकक्ष नरेश पवार, पोनि राहुल मस्के, सपोनि संदिप चव्हाण, सपोनि संतोष उगलमुगले, पोउनि संजय माळी, पोहवा बालाजी शिंदे, पोहवा विलास कडु, पोना दिपक महाजन, पो.कॉ. गुरूनाथ जरग, पो.कॉ. मिथुन राठोड, पो.कॉ. गोरक्ष शेकडे यांनी केली.