शाहू महाराजांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी जाहीर…

कोल्हापूर – शाहू महाराज यांना महाविकास आघाडीतर्फे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.
कोल्हापुरात आज छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. आणखी काही सांगण्याची अवशक्यता नाही. ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे ऋणानुबंध हे माझ्या आजोबांपासून आहेत. त्यामुळे मला आंनद आहे की, या पिढीसह पुढच्या पिढीत ते असेच घनिष्ठ राहतील. आज महाविकास आघाडीतर्फे शाहु महाराज यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराज यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आह. शाहू महाराज यांच्या प्रचार सभेला आणि विजय सभेला मी येणार आहे.